Ad will apear here
Next
पुन्हा मजबूत सरकारचा ‘भाजप-सेना’ युतीचा निर्धार
नागपूरला युती कार्यकर्ता मेळावा


नागपूर : देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भक्कम सरकार सत्तेवर आणण्याचा निर्धार शुक्रवारी नागपूर येथे भारतीय जनता पक्ष–शिवसेना युतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला.

या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर, खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, अशोक नेते तसेच भाजपा शिवसेना युतीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.



या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात परिवर्तन केले आहे. या सरकारने गरिबी निर्मूलनाचे काम प्रामाणिकपणे केले आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि रोजगार अशा प्रत्येक क्षेत्रात गरीबांच्या जीवनात परिवर्तन करणारे काम केले आहे. प्रत्येक भारतीयासाठी आश्वासक काम केले आहे. विरोधकांकडे या सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी काही मुद्दाच नाही. विरोधकांचे एकेक नेते निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहेत. भाजप-शिवसेना युती ही विचारांच्या आधारावर झालेली युती आहे. या युतीच्या माध्यमातून पुन्हा देशात मोदींच्या नेतृत्वाखाली बलशाली भारतासाठी मजबूत सरकार निर्माण करायचे आहे.’



गडकरी म्हणाले की, ‘गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या कामामुळे विरोधक विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करू शकत नाहीत व ते हताश झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस जातीयतेचे विष कालवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत सरकारने केलेले काम हा ट्रेलर असून, अजून फिल्म बाकी आहे. देशाचे भविष्य घडविण्याकरता गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा या वेळी महाराष्ट्रात जिंकायच्या आहेत.’

ठाकरे म्हणाले, ‘भाजप-शिवसेनेने खुल्या दिलाने युती केली आहे. दोन कडवट हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राने हिंदुस्थानला नवी चेतना दिली आहे. हिंदुत्वाचा आवाज बुलंद झाला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा युतीला जिंकाव्या लागतील.’



दानवे म्हणाले, ‘गेली पाच वर्षे केंद्रात व राज्यात भाजप- शिवसेना सरकारने चांगली कामगिरी केली आहे. या कामाच्या जोरावर लोकसभा निवडणूक लढवायची आहे. काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नसल्याने ते हा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करतात; पण निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला हवी. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील.’

नागपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी अमरावती येथे युतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत झाला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZQRBY
Similar Posts
‘कटुता विसरून ‘भाजप-सेने’ला विजयी करण्याचा निर्धार’ औरंगाबाद : भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेनेदरम्यान गेल्या साडेचार वर्षांत जे झाले ते सर्व विसरून एकदिलाने राज्यात लोकसभा निवडणुकीत युतीच्या ४५ जागा निवडून आणण्याचा निर्धार प्रमुख नेत्यांनी १७ मार्च २०१९ रोजी औरंगाबाद येथे भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात व्यक्त केला.
‘युतीमुळे महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा जिंकू’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्ष (भाजप) व शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक युती करून लढतील,’ असा निर्णय १८ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘भाजप’ राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत जाहीर केला. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा युती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘केलेल्या कामांवर ‘एनडीए’ने ही निवडणूक जिंकली’ मुंबई : ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर सन २०१४ची निवडणूक जिंकली; मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ सरकारच्या कामावर २०१९ची ही निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही म्हणणाऱ्या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून, जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती, तर तुफान होते
‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ मुंबई : ‘जळगाव व सांगली–मिरज-कुपवाड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले जबरदस्त यश म्हणजे जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. या विजयाबद्दल मी मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी शुक्रवारी (तीन ऑगस्ट) व्यक्त केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language